बामनी - खेबवडे रस्त्याच्या दुरूस्तीचे काम येत्या चार दिवसात पूर्ण करा - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) - बिद्री ते कागल दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना, एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांना तसेच ऊस वाहतूकदारांना गेल्या एक वर्षापासून खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बामनी - खेबवडे रस्त्याच्या दुरूस्तीचे काम येत्या चार दिवसात पूर्ण करण्याचे आदेश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले असल्याची माहिती कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खेबवडे गावचे माजी सरपंच सुयोग वाडकर यांनी दिली.

बिद्री ते कागल दरम्यानच्या बामनी - खेबवडे या रस्त्यावरील खडीकरण, डांबरीकरण, रुंदीकरण व रस्ता मजबुतीकरणाच्या कामासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून बामणी - खेबवडे परिसरातील खराब रस्त्यामुळे होणारा नागरिकांचा त्रास लवकरच दूर होईल, असेही माजी सरपंच सुयोग वाडकर यांनी सांगितले.




