रयत संघाची मिश्रखते शेतीसाठी वरदान - विश्वासराव पाटील

रयत संघाची मिश्रखते शेतीसाठी वरदान - विश्वासराव पाटील

करवीर (विश्वनाथ मोरे) - रयत कृषि उद्योग सहकारी संघ मर्या. कोल्हापूर यांचा मिश्रखत उत्पादन शुभारंभ रयत सेवा संघ पाडळी खुर्द येथील गोडावून मध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी गोकूळ दूध संघाचे विद्यमान जेष्ठ संचालक व मा. चेअरमन विश्वासराव पाटील उपस्थित होते. मिश्रखत उत्पादन शुभारंभ विश्वासराव पाटील (आबाजी) यांच्या हस्ते करण्यात आला. रयत संघाची मिश्रखते ही शेतीसाठी वरदान असल्याचं प्रतिपादन यावेळी विश्वासराव पाटील (आबाजी) यांनी यावेळी केलं. 

संघाची बैलजोडी छाप हात मिश्रखत १८/१८/१०, १०/२०/२०,२०/१०/१०. या ग्रेडमध्ये तयार करत असून त्यामध्ये कॅल्शीअम, मॅकनेशिअम, व सल्फरयुक्त यांचा वापर केला जातो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये संघाच्या खताच्या मागणीचा आलेख चढता आहे. संघाचे प्रगतीमध्ये संघाचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे आहे. यावेळी रयत संघाचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील यांनी संघाचे बैलजोडी छाप हात मिश्रखता विषयी माहिती दिली.आभार व्यवस्थापक तानाजी निगडे यांनी मानले.  

यावेळी रयत सेवा संघाच्या व्हा.चेअरमन शिवाजी देसाई, संचालक नेमगोंडा पाटील, कुंडलिक पाटील, चितामंश गुरव, सुभाष चौगले, मारूती मोरे, बत्तालय हराळे, विलास पाटील, संभाजी भोसले, दिगब्बर बाटे, विश्वास पाटील, माधुरी जाधव, निर्मला निगडे यांच्यासह आदी उपस्थित होते.