रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ए. आर. तांबे सर संचालित रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रप्रेम, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात दिमाखात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर 'वंदे मातरम्' गीत, राष्ट्रगीत व झेंडागीत याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिरंग्याच्या साक्षीने उमटलेले राष्ट्रगीताचे स्वर प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.

या कार्यक्रमासाठी डॉ. वृषभनाथ व अंजली माणकापूर तसेच राजीव व ज्योती रेवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे होते.

यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय सदस्या सुप्रिया कौदाडे व सर्वव्यवस्थापक सदस्य व प्रिन्सिपल, व्हॉईस प्रिन्सिपल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व वि‌द्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे सर, प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी स्वातंत्र्याचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि राष्ट्र निर्माणातील वि‌द्यार्थ्यांची भूमिका याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी वि‌द्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत अधिक प्रज्वलित झाली. संस्थेचे संचालक अभिषेक तांबे सर, सृष्टी तांबे मॅडम, संगीता पवार मॅडम, दुर्गा मॅडम, नागंद्र सर, सत्यनारायण सर, पॉल सर उपस्थित होते.

वि‌द्याथ्यर्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या निरागस स्वरांतून आणि उत्स्फूर्त सादरीकरणातून मातृभू‌मीवरील प्रेमाची सुंदर अनुभूती उपस्थितांना मिळाली.

संपूर्ण शाळा परिसर 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा जयघोषांनी दुमदुमून गेला. प्रत्येक घोषणेत तिरंग्याचा अभिमान आणि मातृभूमी विषयीची निष्ठा जाणवत होती. वि‌द्याथ्यर्थ्यांच्या मनात देशप्रेम, एकता आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजवणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक सदस्या सुप्रिया कौदाडे मॅडम, प्रिन्सिपल प‌द्मश्री पुरतं मॅडम व व्हॉईस प्रिन्सिपल सागर गिरीगोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वि‌द्याथ्यीनी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्याची ज्योत मनामनांत तेवत ठेवत, राष्ट्रप्रेमाची नवी उमेद जागवत हा अविस्मरणीय सोहळा उत्साह आणि अभिमानाने दिमाखात संपन्न झाला.