लखन बेनाडे खून प्रकरणातील मुख्य संशयिताला राजारामपुरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

लखन बेनाडे खून प्रकरणातील मुख्य संशयिताला राजारामपुरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापुरातील सायबर चौक ते शाहु टोल नाका, तसेच शाहु टोल नाका ते पेद्रेवाडी या परिसरात लखन आण्णाप्पा बेनाडे, रा. रांगोळी यांचा १० जुलै २०२५ रोजी रात्री १० च्या सुमारास खून झाला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात निता उमाजी तडाखे, रा. इचलकरंजी यांनी मयत लखन आण्णाप्पा बेनाडे यांच्या खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी गुन्ह्यांमधील एकूण ११ संशयित आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या गुन्ह्यामधील मुख्य संशयित आरोपी महमंद दस्तगीर कच्छी, वय २२, रा. बाळु मामा गल्ली जवळ, सुभाषनगर, कोल्हापूर हा फरार झाला होता. महमंद कच्छी हा सुभाषनगर भागात आला असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सुभाषनगर परिसरात सापळा रचून महमंद कच्छी याला अटक केली. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक  योगेश कुमार गुप्ता,  शहर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उप निरीक्षक सचिन चंदन, सहा. फौजदार तानाजी चौगुले, पो.हे.कॉ. कृष्णात पाटील, पो.कॉ. संदिप सावंत यांच्यासह आदी पोलीसांनी कारवाईत सहभाग घेतला होता.