सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचा डंका! १५ वर्षांखालील गटात शाहू विद्यालयाला नमवत पटकावले विजेतेपद

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचा डंका! १५ वर्षांखालील गटात शाहू विद्यालयाला नमवत पटकावले विजेतेपद

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेची प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'महानगरपालिका स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा' अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत राजेंद्र घारगे यांच्या स्मरणार्थ 'अवधूत घारगे फाउंडेशन'तर्फे स्पर्धेतील विजयी, उपविजयी आणि तृतीय क्रमांकाच्या संघांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. या बक्षीस वितरण सोहळ्याला मनपा क्रीडा समितीचे सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर, क्रीडा निरीक्षक सचिन पानाडे, महाराष्ट्र हायस्कूलचे प्राचार्य एस. . जाधव, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे सचिव प्रदीप साळोखे क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

१५ वर्षांखालील मुलांचा गट: महाराष्ट्र हायस्कूल चॅम्पियन!

·         उपांत्य फेरी: पहिल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा - असा दणदणीत पराभव केला. केदार भोसले, प्रज्वल कवडे, वेदांत नलवडे आणि श्लोक जाधव यांनी प्रत्येकी गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाने पोदार स्कूलवर - अशी मात केली. शाहूकडून श्रीजीत माळी अर्जुन देवकर यांनी, तर पोदारकडून सूर्यांश पाटीलने गोल केला.

·         तिसरा क्रमांक: पोदार स्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलवर - ने विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. ॲशली डायसने निर्णायक गोल केला.

·         अंतिम सामना: अंतिम लढतीत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाचा - असा एकतर्फी पराभव करत चॅम्पियनशिपवर नाव कोरले. यात वेदांत नलवडेने तर अभिजीत आडुळकर याने गोल केला.

यशस्वी संघात सोहम चिले (कर्णधार/संघ), आराध्य चौगुले, आर्यन पवार यांच्यासह इतर खेळाडूंचा समावेश होता. संघाला क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही. एस. पाटील, शरद मेढे, शुभम मुसळे आणि संतोष पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.

१७ वर्षांखालील मुलींचे निकाल:

·         सेंट झेविअर्स हायस्कूल विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई): सेंट झेविअर्सने - असा विजय मिळवला (ज्ञानेश्वरी खोत हिने विजयी गोल केला).

·         छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल: शाहू विद्यालयाने - ने बाजी मारली (मिताली भोईटे हिने निर्णायक गोल केला).

१७ वर्षांखालील मुलांचे निकाल:

·         विद्यापीठ हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलचा - असा पराभव केला (विभव निकमचा एकमेव गोल).

·         कोल्हापूर पब्लिक स्कूल आणि साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामना - असा बरोबरीत सुटल्यानंतर, ट्रायब्रेकरमध्ये कोल्हापूर पब्लिक स्कूलने - ने विजय मिळवला.

·         महावीर इंग्लिश स्कूलने न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा - असा पराभव केला (वीरवर्धन पाटीलचा विजयी गोल).