पावसाचा जोर वाढला ; कोगे-बहिरेश्वर पूल पाण्याखाली !

पावसाचा जोर वाढला ; कोगे-बहिरेश्वर पूल पाण्याखाली !

विश्वनाथ मोरे (तालुका प्रतिनिधी) : करवीर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पावसाचा हा जोर वाढल्यामुळे कोगे - बहिरेश्वर पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.


वाहनधारकांची गैरसोय होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी आणि वाहनधारकांनी आता कसबा बीड मार्गे जावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नदीकाठच्या आणि पुलाच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास धोका पत्करून प्रवास करू नये, असा इशाराही स्थानिक प्रशासनाने दिला आहे.