'कोजिमाशि'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी कोकाटे

'कोजिमाशि'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी कोकाटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था (कोजिमाशि) अध्यक्षपदी राजेंद्र मारुती पाटील (कागल), तर उपाध्यक्षपदी प्रकाश रामचंद्र कोकाटे (शाहूवाडी) यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत इंगवले होते. शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या. निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले.

अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव संचालक मनोहर पाटील यांनी सुचविले, तर अनिल चव्हाण यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष कोकाटे यांचे नाव संचालक शीतल हिरेमठ यांनी सुचविले, तर श्रीकांत कदम यांनी अनुमोदन दिले. संचालक अविनाश चौगले, बाळ डेळेकर, डॉ. दत्तात्रय घुगरे, दीपक पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, राजेंद्र रानमाळे, मदन निकम, उत्तम पाटील, शरद तावदारे, पांडुरंग हळदकर, श्रीकांत पाटील, सुभाष खामकर, जितेंद्र म्हैशाळे, ऋतुजा पाटील, पांडुरंग पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे उपस्थित होते.

अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष कोकाटे म्हणाले, 'आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा व आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल.'