क्राइम, थ्रिल आणि फॅमिली ड्रामाचं परफेक्ट मिश्रण असणारी 'ही' सीरिज
मुंबई - क्राईम, सस्पेन्स, थ्रिल, ट्विस्ट्स आणि फॅमिली इमोशन्स हे सगळं एकाच वेब सीरिजमध्ये इतक्या कुशलतेनं आणि प्रभावीपणे मांडता येतं, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ही सीरिज. इथे फक्त हिरोच नव्हे, तर व्हिलनसुद्धा ‘फॅमिली मॅन’ म्हणून दिसतो. उत्कृष्ट लेखन, दमदार दिग्दर्शन आणि भक्कम अभिनय एकत्र आले की कसं काहीतरी थरारक तयार होतं, याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे ‘फॅमिली मॅन 3’.

या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नॉर्थ ईस्टमधील मिशनवर जातो. पण अचानक घडणाऱ्या एका मोठ्या घटनेमुळे त्यालाच ‘वॉन्टेड’ व्हावं लागतं. त्याच्या कुटुंबाचं काय होणार? कथा यावेळी नॉर्थ ईस्टच्या पलीकडे देशाबाहेरपर्यंत जाऊन पोहोचते. सात एपिसोड्स आणि प्रत्येक साधारण 45 मिनिटांचा ही सीरिज तुम्हाला स्क्रीनपासून दूर जाऊ देत नाही.
पहिल्याच फ्रेमपासून तुम्हाला पकडून ठेवणारी ही एक भन्नाट सीरिज आहे. फॅमिली एमोशन्सपासून ते जबरदस्त अॅक्शन आणि टेन्शनने भरलेला थ्रिल सगळंच परफेक्टली बॅलन्स्ड आहे. मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत यांची परफॉर्मन्सेस तर एपिक! दोघांचाही प्रत्येक सीन इतका प्रभावी आहे की तुम्ही नजरा हटवू शकत नाही. सस्पेन्स, थ्रिल आणि ह्यूमरचं उत्तम कॉम्बिनेशन या सीरिजला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. कुठेही अनावश्यक सीन नाही. प्रत्येक फ्रेम एंटरटेन करते.
श्रीकांतच्या भूमिकेत मनोज बाजपेयी नेहमीप्रमाणेच अफाट! एजंट आणि कुटुंबवत्सल पती-वडील या दोन्ही भूमिका तो अत्यंत संवेदनशीलतेने साकारतो. जयदीप अहलावतचे सीन्स तर इतके टॉप - क्लास आहेत की तुम्ही ते पुन्हा पाहण्याचा मोह आवरू शकत नाही. निमरत कौरच्या काही सीन्स तर खास उठून दिसतात; तिच्या परफॉर्मन्सने खरोखरच लक्ष वेधलंय. प्रियमणी, अश्लेषा ठाकूर, गुल पनाग आणि वेदांत सिन्हा यांचं कामही तितकंच प्रभावी आहे.
लेखक राज, डीके आणि सूमन कुमार यांनी कथेला दिलेलं धारदार लिखाण आणि राज - डीके व तुषार शेट्टी यांनी केलेलं प्रभावी दिग्दर्शन, दोन्ही सीरिजचं मुख्य शक्तिस्थान ठरतं. प्रत्येक पात्र, प्रत्येक सीन एक वेगळी छाप सोडून जातो.




