छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम : अफजलखानाचा वध
ऐतिहासिक बातमी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक लढाई ही प्रेरणा आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यांपैकी सर्वात ऐतिहासिक आणि थरारक घटना म्हणजे अफजलखानाचा वध. गरिब रयतेवर अन्याय करणाऱ्या आणि स्वराज्यावर गदा आणणाऱ्या अफजलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी थेट सामना देत पराभूत केले. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर महाराजांनी केवळ अफजलखानाचा वधच केला नाही, तर त्याच्या विशाल सैन्यालाही पराभूत करून स्वराज्यावर आलेले संकट दूर केले.

10 नोव्हेंबर हा दिवस त्यामुळे इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. कारण, या दिवशीच 1659 मध्ये अफजलखानाचा वध झाला आणि स्वराज्याच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला.
आजच्या दिवशी घडलेल्या अन्य ऐतिहासिक घटना -
1698 : ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाकडून कलकत्ता बंदर विकत घेतले.
1958 : गुजरातमधील वेदसर येथे तेलाचा शोध लागला.
1970 : सोव्हिएत युनियनचे लुना 17 हे अनक्रूड स्पेस मिशन प्रक्षेपित झाले.
1983 : बिल गेट्स यांनी जगप्रसिद्ध विंडोज 1.0 प्रकाशित केले.
1990 : चंद्रशेखर भारताचे 8 वे पंतप्रधान झाले.
2008 : नासाने फिनिक्स मंगळ मोहिमेचा यशस्वी समारोप जाहीर केला.




