जिल्हा परिषद येथे सद्भावना दिनानिमित्त सर्वधर्मसमभावाची शपथ

जिल्हा परिषद येथे सद्भावना दिनानिमित्त सर्वधर्मसमभावाची शपथ

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे गुरुवारी सद्भावना दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याची शपथ घेण्यात आली. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आयोजित या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली.

 

या प्रसंगी उपस्थितांनी जात, धर्म, वंश, प्रदेश किंवा भाषा यांचा कोणताही भेदभाव न करता सर्व भारतीयांमध्ये भावनिक ऐक्य व सामंजस्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. तसेच, कोणत्याही प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा मार्ग न स्वीकारता संवाद आणि संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची शपथ घेण्यात आली.

सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस 'सद्भावना दिवस' म्हणून पाळला जातो. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.