निखिल सुर्वे याला पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांकडे सोपविले

निखिल सुर्वे याला पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांकडे सोपविले

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : कुमार निखिल संदीप सुर्वे वय १२ राहणार विठ्ठलई कॉलनी मनेर मळा उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा त्यांचे राहते घरातून आजोळी उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे जाण्याकरिता निघाला होता.तो जयसिंगपूर एसटी स्टँड येथे आला, परंतु त्यास उदगाव येथे कसे जावे हे समजत नव्हते त्यामुळे तो जयसिंगपूर एसटी स्टँड येथे एकटाच बसला होता.

दरम्यान येथे बसलेले इसम शरद पांडुरंग लुगडे वय 42 राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी त्याची चौकशी केली आणि त्याला जयसिंगपूर पोलीस ठाण्यात घेऊन आले.त्यानंतर पोलीस इनामदार व पोलीस हेडकॉन्स्टेबल बक्कल नंबर 2068 कुलकर्णी या सर्वानी मिळून व्हाट्सअप ॲप द्वारे तसेच बातमीदारांचे मार्फत नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांचे उद्गगाव गावी राहणारे मामा अनिकेत दत्तात्रय शिंदे काळमवाडी वसाहत उदगाव यांचा शोध लागल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला.त्यानंतर कुमार याला त्यांचे आजोबा दत्तात्रय बाबु शिंदे वय 63 वर्षे राहणार उदगाव तालुका शिरोळ यांचे ताब्यात देण्यात आले.