महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा मराठा सेवा संघातर्फे विशेष सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र साहेब पवार हे केवळ एक कुशल प्रशासक आणि अभियंता नसून, लोकाभिमुख सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे एक संवेदनशील नेतृत्व म्हणून सर्वपरिचित आहेत. आपल्या ३६ वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ सेवेतून त्यांनी प्रशासकीय कौशल्यासोबतच सदैव समाजहिताची जोपासना केली आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी मराठा सेवा संघातर्फे सांगली येथे एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्याला मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजिनीयर नवनाथ घाडगे, विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा मोरे ताई, विभागीय कार्याध्यक्षा चारुशीला ताई पाटील यांच्यासह कोल्हापूर सांगली व सातारा येथील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




