जि. प. कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदे यांची बिनविरोध निवड

जि. प. कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदे यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय श्रीपतराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना संजय शिंदे यांनी संस्थेच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी निश्चित आणि नियोजनबद्ध काम करण्याची ग्वाही दिली. तसेच, संस्थेचा कारभार सर्व सभासदांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत पारदर्शकपणे चालवण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निवड बैठकीवेळी जयकुमार रेळेकर, बाजीराव पाटील, नंदीप मोरे, श्रीकांत चव्हाण, रवींद्र जारळी, सुनील पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम बावरे, रणजित पाटील, मुज्जमिल नाळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगाडकर, राहुलराज शेटके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजनी कोरी, सोनाली गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, संस्थेचे तज्ज्ञ संचालक म्हणून प्रवीणकुमार पाटील व स्वप्निल घस्ते यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.