शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हाडांची तपासणी शिबिर

शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हाडांची तपासणी शिबिर

यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये हाडांचा ठिसुळपणा मोजणेचे (बी.एम.डी. टेस्ट) शिबिर झाले. शरद हॉस्पिटल व सिताराम आयुर्वेद, केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर झाले. शिबिराचे उदघाटन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद कणप प्रमुख उपस्थिती होती. 

रुग्णाचे बोन मिनरल डेन्सटी अत्याधुनिक मशिनव्दारे तपासण्यात आले. यामध्ये शंभरपेक्षा अधिक महिला व पुरुषांनी तपासणी केली. त्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सल्ला व औषध मोफत देण्यात आले. यावेळी अनिल बागणे म्हणाले, शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने अल्पावधीतच रुग्णसेवेत विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. वयोमानाने हाडे ठिसूळ होतात, त्याची वेळीच तपासणी करुन उपचार केल्यास पुढील धोका टळतो. शरद आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये विविध रोगांची तपासणी व उपचारांचे शिबिर होत असतात. नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा. 

यावेळी डॉ. अमीत मासुले, डॉ. माधुरी रोड्ड यांच्यासह सीताराम आर्युवेदचे वैद्यकीय प्रतिनिधी अरविंद इंजे, हर्षद कवठेकर उपस्थीत होते.