सुट्टीत आजोळी गैरप्रकार; प्रेग्नंसीच्या भीतीनं पपई खाल्ली – अभिनेत्रीचा खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कनिका मान सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्यासोबत झालेल्या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी गेल्यानंतर नात्यातीलच एका भावाने शारीरिक शोषण केल्याचा खळबळजनक खुलासा तिने केलाय. या घटनेमुळे ती इतकी घाबरलेली की आपण गरोदर होऊ अशी भीती तिला वाटलेली असंही तिनं सांगितलं. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं हा खुलासा केलाय.

अभिनेत्री कनिका मान हिने तिच्या लहानपणी घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाविषयी खुलासा केला. तिने सांगितलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा सगळं कुटुंब एकत्र जमायचं, तेव्हा तिच्या एका चुलत भावाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. .त्यावेळी मला नक्की काय घडतय हे समजणे इतकं माझं वयच नव्हतं.पण काहीतरी चुकीचं घडल्याचे जाणीव मला सतत होत होती असं तिने सांगितलं. अनेक वर्ष हा कटू अनुभव तिने दाबून ठेवलेला. कनिकानं सांगितलं," लहान मुलांसाठी अशा गोष्टी सांगणं फार कठीण असतं.त्यांना वाटत असत आपल्याला कोणी समजून घेईल का ? आपल्याला ओरडा पडेल या भीतीने अनेक मूल गप्प राहतात. माझ्या बाबतीतही तेच घडलं होतं. " कनिकाच्या खुलाशाने मोठी खळबळ उडाली आहे.प्रकाराने माझ्या मनात भीती बसली होती. अशा घटनांमुळे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो.
कनिकानं सांगितलं ' मी भीतीपोटी खूप पपई खायला लागले. मी घरी माझ्या बहिणीकडून किंवा मावशीकडून ऐकले होते की, गरोदरपणात पपई खाऊ नये नाहीतर गर्भपात होऊ शकतो. मला गरोदर असल्याची भीती वाटत होती.त्यामुळेच मी पपई खायला सुरुवात केली. " असं कनिकाने सांगितलं.ती म्हणाली मी त्यावेळी माझ्या आई वडिलांनाही सांगितलं नव्हते. कारण तुम्हाला भीती वाटते अपराधी वाटतं आपण काहीतरी चुकीचं केलं आहे का असा विचार मनात येतो. त्यावेळी माझ्या मनात हेच विचार आले होते. त्यामुळे खूप नंतर मी ही गोष्ट आई-वडिलांना सांगितली " असं ती म्हणाली.
कनिकाचा जन्म हरियाणातल्या पानिपत येथे झाला. तिला अभिनयाची ओढ सुरुवातीपासूनच होती. 2016 मध्ये बढो बहु या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.त्यानंतर झी टीव्हीवरील गुड्डन 'तुमसे ना हो पयेगा' या मालिकेत ती दिसली. नंतर खतरों के खिलाडी 12 मध्ये तिनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवली. 'नागिन 7 ' मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे .




