हरभजनची ‘गुगली’ – आपचा गेम ओव्हर, कमळाला साथ

हरभजनची ‘गुगली’ – आपचा गेम ओव्हर, कमळाला साथ

मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीने फलंदाजांना घाम फोडणारा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने राजकारणात मोठा निर्णय घेतला आहे.भज्जीने आम आदमी पार्टीचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तो आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.शुक्रवारी दुपारी राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, हरभजन सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते ‘आप’च्या आणखी सात खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भज्जीने 2021 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंग आम आदमी पार्टीत सामील झाला. मार्च 2022 मध्ये त्यांची पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

पंजाबमधील क्रिकेटरमधून राजकारणात येणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी नवज्योत सिंग सिद्धू यांनीही राजकारणात प्रवेश केला होता.45 वर्षीय हरभजन सिंह याने भारतासाठी 103 कसोटी, 236 वनडे आणि 28 टी20 सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 417, वनडेमध्ये 269 आणि टी20 मध्ये 25 विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये त्याने 163 सामने खेळत 150 विकेट्स घेतल्या आहेत.