आंतर महाविद्यालयीन बुध्दीबळ स्पर्धेत शरद कृषीचा प्रथम क्रमांक
जैनापूर : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयच्या मुलांच्या संघाने आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत के व्ही पटेल कृषी महाविद्यालय शहादा (जि. नंदुरबार) येथे स्पर्धा झाल्या.

स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १३ जिल्ह्यातील २३ संघ सहभागी झाले होते. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश पाटील हे होते. कार्यक्रमाला शहादा येथील उपविभागाचे पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थीत होते.
स्पर्धेत आदित्य खिलारे (कॅप्टन), शिवलिंग वाणी, वसीम फकीर, श्रेयश पारडॊळे, गणेश नगराळे हे खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये आदित खिलारे यांनी सात मॅचेस पैकी सहा जिंकून विद्यापीठच्या संघात प्रथम स्थान मिळवले. व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघात निवड झाली आहे. त्यांना शरद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.




