कपिलच्या पंचला सिद्धार्थचा झटपट रिप्लाय; म्हणाला, "माझी बायको अदितीपेक्षाही सुंदर!"
मुंबई (प्रतिनिधी) : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा लोकप्रिय कॉमेडी आणि सेलिब्रिटी चॅट शो असून त्याचं सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. या शोमध्ये बॉलिवूड, क्रीडा, संगीत आणि इतर विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येतात. त्यानंतर कपिल शर्मा आणि त्याची टीम खास विनोदी शैलीत त्या पाहुण्यांचं स्वागत करते आणि त्यांच्याशी हसत-खेळत संवाद साधते. कपिलच्या या शोमध्ये मजेशीर किस्से, विनोदी स्किट्स आणि कलाकारांमधील धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते. या कार्यक्रमात सुनील ग्रोव्हर,कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, राजीव ठाकूर आणि अर्चना पूरन सिंह यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकतात. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा पूर्वीच्या The Kapil Sharma Show या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवा अंदाज आहे.

काही दिवसांपूर्वी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये 'गांधी टॉक्स' या सिनेमाची टीम आली होती. त्यावेळी ए. आर. रहमान, विजय सेतुपती,अदिती राव हैदरी आणि मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव उपस्थित होते. शोमध्ये अनेक पंच, मजेशीर स्किट्स सुरू होते. त्यातच अदिती राव हैदरीच्या सौंदर्यावरही अनेक पॉझिटिव्ह विनोद करण्यात आले. शो पुढे जात असतानाच मध्ये एक स्किट येतं, त्यात कपिल शर्माच्या टीममध्ये असलेला कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा मुलींच्या वेशात स्टेजवर येतात आणि पाहुण्यांशी संवाद साधत वेगवेगळे पंच मारतात. याचवेळी एक संभाषण सिद्धार्थ जाधवपर्यंत येतं आणि त्यावेळी क्षणार्धात सिद्धार्थ जे उत्तर देतो, ते ऐकून थक्क व्हायला होतं. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




