कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आ. राजेश क्षीरसागर यांचे मानले आभार

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आ. राजेश क्षीरसागर यांचे मानले आभार

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील वकिलांच्या सुरक्षिततेसाठी विधिमंडळात महत्त्वपूर्ण विधेयक मांडल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन जाहीर आभार मानण्यात आले. वकिलांवर होणारे वाढते हल्ले आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, विधिमंडळात या संदर्भातील आवाज उठवल्याबद्दल वकिलांनी आमदार क्षीरसागर यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि कृतज्ञता व्यक्त केली. या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष ॲड. संजय घाटगे, माजी अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील आणि ॲड. आर. एल. चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश होता.  तसेच वकिलांच्या सुरक्षेचा हा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी अपेक्षाही या प्रसंगी वकिलांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

 याशिवाय जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. अवधुत पाटील, स्टेट यंग लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. चेतन शिंदे, उपाध्यक्ष ॲड. अभिषेक देवकर, लोकल ऑडीटर ॲड. सर्वेश भांदिगरे आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. वैभव गोरडे या वेळी उपस्थित होते.