डीकेटीईचा डंका ! जागतिक कीर्तीच्या आयटी कंपनीत २९ मुलींची बाजीचज संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून विशेष अभिनंदन
कोल्हापूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील प्रसिद्ध डीकेटीई (DKTE) संस्थेच्या इंजिनिअरींग विभागातील तब्बल २९ विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. फ्रान्सस्थित आणि जागतिक कीर्तीची आयटी कंपनी 'कॅपजेमिनी, पुणे' द्वारे आयोजित कॅम्पस प्लेसमेंटमध्ये या विद्यार्थिनींची आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे."

"कॅपजेमिनी कंपनीच्या पुणे कार्यालयामार्फत देशभरातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्निकल मुलाखत आणि एच.आर. अशा तीन कठीण टप्प्यांतून जात डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी आपल्या तांत्रिक ज्ञानाच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर आपले स्थान निश्चित केले आहे."
या यशस्वी विद्यार्थिनींमध्ये:
- कॉम्प्युटर विभाग: अहिल्या हपटे, मानसी कुरडे, ऋतुजा भुते, श्रुती होगाडे, नम्रता जाधव, साक्षी पाटील, वैष्णवी सावंत, प्रणोती आठवले आणि साक्षी बडे.
- AIML विभाग: श्रुती खवाटे, प्रियंका लंगोटे, पलक सारस्वत, अलिषा अत्तार, इशिता मेहता, सानिका पाटील, समीक्षा हेरवाडे, पूर्वा पवार आणि गौतमी पाटील.
- AI डाटा सायन्स विभाग: सानिया चव्हाण, साक्षी आरगे, श्रुती बोरा, अश्विनी पवार आणि तौसिया फकीर.
- ENTC विभाग: आर्या दरीबे, मृणाली घनवट, प्रतीक्षा खडसरे, वैष्णवी पवार, विजयलक्ष्मी थावरे व पौर्णिमा जाधव यांचा समावेश आहे."
डीकेटीई संस्थेत दिले जाणारे प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण, मॉक इंटरव्यूव्ह, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासामुळे विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये यश मिळवणे सोपे जात आहे. तर स्पर्धात्मक आयटी क्षेत्रात डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश संस्थेच्या उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारे ठरले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आणि कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे. तसेच संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, सर्व विभागप्रमुख आणि टीपीओ प्रा. जी. एस. जोशी व प्राध्यापकांचे या विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन लाभले.




