डीकेटीईचा देशातील वस्त्रोद्यागातील अग्रगण्य ट्रायडेंट इंडिया कंपनीशी सामंजस्य करार

डीकेटीईचा देशातील वस्त्रोद्यागातील अग्रगण्य ट्रायडेंट इंडिया कंपनीशी सामंजस्य करार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डीकेटीईचे टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि देशातील वस्त्रोघोगातील आग्रगण्य ट्रायडेंट इंडिया कंपनी यांच्याशी,वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी महत्वाचा सामंजस्य करार झाला आहे. डीकेटीई चे पदाधिकारी व ट्रायडेंट इंडिया कंपनीचे पदाधिकारी यांच्यात कराराचे आदानप्रदान झाले. हा करार डीकेटीई व ट्रायडेंट ग्रुप यांच्यातील दिर्घकालीन सहकार्याचे नवे पर्व ठरुन, डीकेटीईतील तंत्रज्ञान, संशोधन व नवोपक्रमाला नवी दिशा देणार आहे.  

या करारामुळे विद्यार्थी व प्राध्यपकांना अधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम, औद्योगिक अनुभव, तज्ञमार्गदर्शना खालील कार्यशाळा, इंटर्नशिप आणि संयुक्त संशोधन प्रकल्पांमध्ये सह भागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच डीकेटीईमधील नवोन्मेष केंद्राच्या माध्यमांतून नविन संकल्पना, प्रोटोटाईम्स आणि उत्पादन विकासाला अधिक चालना मिळणार आहे. या कराराअंतर्गत डीकेटीईकडुन वस्त्रोद्योग वाढीसाठी अवश्यक ते सहाय करण्यात येईल तसेच टेक्नीकल टेक्स्टाईल, टेक्स्टाईल केमिस्ट्री, हाय परफॉरम्न्स टेक्स्टाईल, पॉलीमर आणि कंम्पोझिट या विषयामध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी ट्रायडेंटला मदत करणे अशा अनेक बाबींचा समावेश आहे. यामुळे इंडस्ट्रीमधील गुणवत्ता वाढीसाठी देखील फायदा होणार आहे.

ट्रायडेंट कंपनीबरोबरचा हा करार डीकेटीईच्या शैक्षणिक परिसंस्थेला एक नवी बळकटी देणारा असून उद्योगातील तज्ञता आणि ट्रायडेंटचा समृध्द अनुभव विद्यार्थ्यांना उदयोगसिध्द व्यवसायिक बनविण्यासाठी मोठी मदत करेल असे प्रतिपादन कराराप्रसंगी संस्थेच्या संचालिका डॉ. एल.एस.अडमुठे यांनी काढले. डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील यांनी ट्रायडेंटसारख्या आघाडीच्या उदयोगसमूहासोबत कार्य केल्याने उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी आणि नाविण्यपूर्ण उत्पादन विकासासाठी नवी दारे उघडली जाणार आहेत यावेळी गौरवद्गार काढले. या कार्यक्रमामध्ये संचालिका प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील ट्रायडेंटच्या अलका जमुदा यांच्यामध्ये कराराचे अदानप्रदान झाले यावेळी डीकेटीईचे टेक्स्टाईल विभागाचे सर्व कोर्स कोर्डिनेटर उपस्थित होते.

सदर करार संपन्न होण्यासाठी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. या करारासाठी प्रा. डॉ. वाय. एम. इंडी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.