तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांमुळे विरोधक आक्रमक; समर्थनासाठी शेतकरी मैदानात

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांमुळे विरोधक आक्रमक; समर्थनासाठी शेतकरी मैदानात

मुंबई (प्रतिनिधी) : धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर कारवाईचा धडका लावला आहे. दूध भेसळ, अन्न भेसळ, मेडिकल, औधष पुरवठा करणाऱ्यांवर धाडसत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे.राज्यभरात 100 हून अधिका ठिकाणी छापे टाकत अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.एकीकडे तुकाराम मुंढेंना काही गुंडांकडून धमकी देण्यात आली असता, दुसरीकडे त्यांच्या कारवाईच्या धडाक्याचं शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.

कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरालगत यड्राव गावात पनीर उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर शहापूर पोलीस आणि कोल्हापूर अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. तसेच दुध भेसळीच्याही कारवाया सुरू आहेत.तुकाराम मुंढेंच्या धाडसी बाण्याचं दुध उत्पादक शेतकऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने स्वागत केलंय. आटपाडी तालुक्यातील बनपुरीत तुकाराम मुंडे यांच्या कार्याला दुग्धाभिषेकातून जाहीर पाठिंबा दिला. भेसळयुक्त दूधविरोधात शेतकरी, दूध उत्पादक व नागरिक एकवटले आहेत.

बनपुरी येथील शेतकरी, दूध उत्पादक आणि नागरिकांनी शुक्रवारी एकत्र येत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.भेसळमुक्त दूध अभियानाला बळकटी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून शेतकरी व ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.