'या' निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज जमा करावे - आ. सतेज पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांसाठी अध्यक्षपद आणि वार्ड आरक्षण निश्चित झाले असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आरक्षणही अलीकडेच जाहीर करण्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच संबंधित तालुकाध्यक्षांकडे उपलब्ध असतील. इच्छुकांनी अर्जासोबत तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे देणगी रक्कम जमा करणे आवश्यक आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि विधान परिषद गटनेते आ. सतेज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




