राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू; नोंदणीसाठी अवघे ५ दिवस बाकी

राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू; नोंदणीसाठी अवघे ५ दिवस बाकी

 मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील तब्बल ३० हजार २०९ रिक्त शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती प्रक्रिया 'पवित्र पोर्टल'च्या माध्यमातून वेगाने सुरू झाली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

या भरतीसाठी 'शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२५' ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. या चाचणीसाठी लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण केले होते.

पद्धत आणि श्रेणीनिहाय तपशील:

·         जिल्हा परिषदा: १३,३५१ पदे

·         खासगी संस्था: १२,१४८ पदे

·         आदिवासी विकास विभाग: ,४२१ पदे

·         महानगरपालिका: ,९५४ पदे

·         नगरपालिका/परिषद: २८० पदे

·         शासकीय विद्यानिकेतन: ५६ पदे

वर्गांनुसार पदे:

यात इयत्ता पहिली ते पाचवीची १४,३२० पदे, सहावी ते आठवीची १०,०१२ पदे, नववी ते दहावीची ,५१३ पदे आणि अकरावी ते बारावीच्या ३६४ पदांचा समावेश आहे.

·         एकूण रिक्त पदे: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात ३० हजार २०९ शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती केली जात आहे.

·         मुलाखतीचे स्वरूप: यातील १९ हजार ८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर १० हजार ३२८ पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत.

·         अंतिम मुदत: उमेदवारांना प्राधान्यक्रम (पसंतीक्रम) निश्चित करून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करणे बंधनकारक आहे.

 महत्त्वाची तारीख आणि संकेतस्थळ:

उमेदवारांनी पदभरतीसाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले प्राधान्यक्रम निश्चित करायचे आहेत. यासाठीची सुविधा ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, उमेदवारांना ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय असणाऱ्या पदांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.