रिया पाटील हिचा विद्यार्थी पालक संघटनेतर्फे सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) - विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी रिया पाटील हिने विद्यापीठ स्तरावर राजस्थान येथे झालेल्या नॅशनल लेव्हल खेलो इंडिया या ८०० मीटर अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळवून शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूरचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल विद्यार्थी पालक संघटनेतर्फे अध्यक्ष अविनाश माने, सचिव फिरोज सरगुर सदस्य सुभाष घाटगे यांनी रिया पाटील हिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.

रिया पाटील हिने २० आशियायी स्पर्धेत ४x४०० मीटर रिले स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच आतापर्यंत तिने १८ राष्ट्रीय पदके मिळविली आहेत. ती खेलो इंडिया स्पर्धेची सलग ५ वर्षे विजेती आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये तीने हे यश प्राप्त केले आहे. तिचे वडिल व आई हे खासगी नोकरी करून तिला प्रोत्साहन देत आहेत.
यावेळी रिया पाटील हिचे वडिल नितीन पाटील, आई अर्चना पाटील, भाऊ अथर्व पाटील, आजी उपस्थित होते.




