अशोक खरातच्या केबिनमध्ये SIT चं पथक पोहोचलं; शटर उघडताच काय दिसलं?

अशोक खरातच्या केबिनमध्ये SIT चं पथक पोहोचलं; शटर उघडताच काय दिसलं?

मुंबई (प्रतिनिधी) : अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे.अशोक खरातच्या ओकस कार्यालयात एसआयटीच्या पथकाने आज तपासणी केली.अशोक खरात याच कार्यालयात अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत होता. त्याच ठिकाणी आता एसआयटीचं पथक पोहोचलं आहे.

अशोक खरातने महिलांवर ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले त्या ठिकाणाची SIT कडून तपास सुरू आहे. या कार्यालयात अनेक कागदपत्रे आहेत.अशोक खरातच्या या कार्यालयात एसआयटीला कोणते पुरावे हाती लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.तपासणी केल्यानंतर अशोक खरातचं ओकस कार्यालय एसआयटीकडून सील करण्यात आले.अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे.

नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार येईल.