इंधन बचतीसाठी कोल्हापूर जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना

इंधन बचतीसाठी कोल्हापूर जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना

कोल्हापूर( प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानानुसार इंधन बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी सायकल, बस अथवा शक्य असेल तर पायी चालत येण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी दिल्या.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सोने वर्षभर खरेदी करू नका, सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, पेट्रोल व डिझेल बचत करण्यासाठी सायकल वापर करणे इत्यादींसाठी आवाहन केले होते, त्यानुसार आता राज्य व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी त्याची अंमलबजावणी करत असल्याचे दिसू लागले आहे, त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे तसेच प्रत्येक शुक्रवारी सायकलने अथवा शक्य असल्यास पायी येण्याच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.