चिंतनशील इतिहासकार आणि कोल्हापूरचे खरे सुपुत्र हरपले-खासदार धनंजय महाडिक

चिंतनशील इतिहासकार आणि कोल्हापूरचे खरे सुपुत्र हरपले-खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि इतिहास चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवचरित्राचा आणि राजर्षी शाहू चरित्राचा नेमकेपणाने शोध घेऊन, तो भारतासमोर मांडणाऱ्या पवार सरांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा आणि पुरोगामी विचारधारा जपली.

एक व्यासंगी आणि अभ्यासू इतिहास संशोधक म्हणून त्यांचे नाव अजरामर राहील. मोगल मर्दिनी ताराराणी यांचा पराक्रमी इतिहास आणि मराठ्यांच्या युद्धनीतीची शौर्यगाथा त्यांच्यामुळेच जगासमोर आली. ते अत्यंत बुद्धिमान आणि विनम्र असे थोर इतिहास संशोधक आणि कोल्हापूरचे सुपुत्र होते. अशी प्रतिक्रिया खा.धनंजय महाडिक यांनी दिली