जि.प.शाळांमध्ये गुणवत्ता वाढ व दर्जा सुधारण्यावर भर द्या- सभापती शीतल यादव
कोल्हापूर (प्रतिनिधी): प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढ करणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे तसेच शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण व क्रीडा सभापती शितल यादव यांनी सूचना दिल्या. त्या जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व मुख्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या समवेत आयोजित बैठकीत बोलत होत्या.

सभेला शिक्षण समितीचे नुतन सदस्य, जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी व मुख्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी, उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.मिना शेंडकर यांचेकडून PPT व्दारे सभापती व नुतन शिक्षण समिती सदस्य यांना विभागाकडील सर्व योजनांची माहिती व विभागाने राबविलेल्या उपक्रमांबाबतची माहिती सादर करणेत आली.
सभापती यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आप-आपल्या तालुक्यातील शैक्षणीक गुणवत्ता व पटवाढी संदर्भात मार्गदर्शन करुन सर्व संघटना प्रतिनिधी यांच्या समवेत विदयार्थी व शिक्षक यांच्या गणवेशाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, सदस्य भगवान पाटील,उत्तरा शिंदे, स्नेहल वेल्हाळ,रेखाताई मुगडे, शुभांगी कुंभार यांच्यासह जि.प.सदस्य उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील व जि.प.सदस्य यांनी सर्व योजनांचे व उपक्रमांचे आयोजन चांगल्या पध्दतीने केल्याबाबत अभिनंदन केले.




