जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत यांची विविध विभागांना भेट; कामकाजाबाबत सूचना

जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत यांची विविध विभागांना भेट; कामकाजाबाबत सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कामकाजात गती येण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी दिल्या. बांधकाम, ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाबाबत ची माहिती घेतली. अध्यक्षा खोत यांनी अचानकपने विविध विभागांना भेटी दिल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

जिल्हा परिषद मध्ये कामासाठी येणाऱ्या व्यक्तींची काम वेळेत पूर्ण करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भेटी दरम्यान स्वच्छताग्रहांची स्वच्छता नसल्याने नाराजी व्यक्त केली. स्वच्छता ग्रहांची वेळोवेळी देखभाल करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. जिल्हा परिषद इमारत परिसर स्वच्छताबाबत विशेष खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी बांधकाम व इमारत विभागास दिल्या.