जिल्हा परिषद मध्ये छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषद मध्ये   छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर(प्रतिनिधी):जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने व दिमाखात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश यादव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर कलामंच यांच्या वतीने राज्यगीत गायन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पोवाड्याचे गायन करण्यात आले.  यामुळे परिसरात महाराष्ट्राच्या अभिमान,स्वाभिमान,प्रेरणेची भावना दाटून आली.कार्यक्रमस्थळी महाराजांची अप्रतिम व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रभावी व सुबक सूत्रसंचालन सुषमा पाटील, सहाय्यक शिक्षिका, मेन राजाराम हायस्कूल यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व प्रेरणादायी ठरला.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम व सुशासनाच्या आदर्शांचा अंगीकार करून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

जिल्हा परिषद, कोल्हापूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले.