पवार ट्रस्टतर्फे उखाणे स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

पवार ट्रस्टतर्फे उखाणे स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माजी अध्यक्षा कै. सौ. पद्मजा जोतीराम पवार यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने ट्रस्टतर्फे खास महिलांसाठी उखाणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा शनिवार २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता राजोपाध्येनगर जवळील राधाकृष्णनगर येथील पवार ट्रस्टच्या हॉलमध्ये स्पर्धा होणार आहे. 

स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास रु. ११११/-, द्वितीय क्रमांकास रु.‌७०१/-, तृतीय क्रमांकास रु. ५०१/-, चतुर्थ क्रमांकास रु. ३०१/- आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. २५०/- अशी पाच पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून मंगळवार २३ सप्टेंबर पर्यंत ७५१७२१११३१ या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवून नावनोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त श्रद्धा पवार आणि राजकुंवर पवार-डफळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.