ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, आठ दशकांपासूनचा चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड
मुंबई (प्रतिनिधी): आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.




