डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट महाराष्ट्रात पहिले

डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट महाराष्ट्रात पहिले

यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२६ प्रोजेक्ट स्पर्धेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, सलग सहाव्या वर्षी ही मानाची कामगिरी नोंदवत संस्थेने महाराष्ट्रात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डिपेक्स व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४०० प्रकल्प सहभागी झाले होते. यामध्ये शरद इन्स्टिट्युटच्या सात प्रकल्पांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी दोन प्रकल्प विजेते, तर एक प्रकल्प उपविजेता ठरल्याने संस्थेच्या यशात आणखी भर पडली.

इंजिनिअरिंगमधील ऊर्जा श्रेणीत सस्टेनेबल स्पेस कूलिंग थ्रू लो कॉस्ट इव्हॅपोरेटिव सिस्टिम हा प्रकल्प विजेता ठरला. हा प्रकल्प डॉ. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणीता शेटे, सलोनी पाटील, (अॅटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स), सानिया गाट, सोफिया मुलाणी (मेकॅट्रॉनिक्स), साबिया शेख, फराना शेख (मेकॅनिकल) विद्यार्थ्यांनी निर्माण केला. 

कॉम्प्युटेशनल इंटेलिजेन्स श्रेणीत शरद पॉलिटेक्निकच्या स्मार्ट ग्लासेस फॉर ब्लांइड पिपल हा प्रकल्प विजेता ठरला. प्रणव शर्मा, यश देसाई, वेदांत कलगुंडी, सार्थक बुचडे (कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) यांनी प्रा. शर्मीला बहिरगुंडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रकल्प केला. अॅटोमेशन अॅण्ड रोबोटीक्समधील अदित्य पाटील, हर्षद पाटील, समिम मुजावर, रेहान शेख यांनी प्रा. पी. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोनॉमस लिडार सर्व्हेलन्स अँड अँटी टँक न्यूट्रलायझर सिस्टिम हा प्रकल्प केला. त्याला डिफेन्स अॅण्ड सायबर सिक्युरिटी श्रेणीत व्दितीय क्रमांक मिळाला. 

प्रभारी प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे, प्राचार्य बी.एस. ताशीलदार यांचे सहकार्य मिळाले. समन्वयक म्हणून प्रा. धनश्री बिरादार, प्रा. पूजा माळी यांनी काम पाहिले. संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.