ताराराणी महोत्सव मिनी सरसचे 14 ते 18 मार्च रोजी आयोजन

ताराराणी महोत्सव मिनी सरसचे 14 ते 18 मार्च रोजी आयोजन

कोल्हापूर( प्रतिनिधी): जिल्हा परिषदेकडील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने १४ ते १८ मार्च या कालावधीत सासने मैदानात ताराराणी महोत्सव मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे.          

 महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता महोत्सावाचे उदघाटन करण्यात येणार आहे. 

    सासने मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात २०० स्वयंसहायता समूह सहभागी होणार आहेत. ८० स्टॉल वस्तूंचे आणि ४० स्टॉल खाद्याचे आहेत. याबरोबर पोवाडा, कलामंच, गीत व गायन, गाथा महाराष्ट्राची, हास्य सम्राट असे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. 18 मार्च रोजी महोत्सवाचा समारोप होणार आहे.