न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळाचा अभिमानास्पद पराक्रम!
कोल्हापूर (प्रतिनिधी) - भादोले (ता. हातकणंगले) येथील न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळ यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये आपल्या उज्वल कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. १५ खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी निवड होणे ही संघाची मोठी उपलब्धी मानली जात आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत दुहेरी विजय :
क्रीडा कार्यालय, बीड येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळाच्या मुलां - मुलींच्या दोन्ही संघानी प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेची पात्रता मिळवली आहे.
मुलांचा संघ (छत्रपती संभाजीनगर विभाग) :
कर्णधार : मनीष पोवार
खेळाडू : आर्यन पोळकर, यश माने, समर्थ पडवळ, प्रथमेश पाटील, अथर्व अवघडी
मुलींचा संघ (छत्रपती संभाजीनगर विभाग) :
कर्णधार : तृप्ती रसाळ
खेळाडू : श्रेया संकपाळ, समृद्धी मुंगुरकर, कविता बोडके
नाशिक (मालेगाव) येथील स्पर्धेमध्येही यश :
१९ वर्षाखालील मुलींच्या गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
मुलींचा संघ (नाशिक विभाग) :
कर्णधार : माधवी जाधव
खेळाडू : अक्षता कामते, नंदिनी वड्ड, शर्वरी पाटील
या यशामागे दीपराज जामदार, संतोष वड्ड, सागर चव्हाण आणि गणेश पोवार या प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.
न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळाची ही कामगिरी म्हणजे संघभावना, शिस्त आणि कठोर मेहनतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरांवर मिळालेल्या या यशामुळे मंडळाची ‘विजयाची परंपरा’ अधिक भक्कम होत आहे.




