पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; काकडेंच्या उमेदवारीवरून अजितदादांच्या गटात नाराजी

पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; काकडेंच्या उमेदवारीवरून अजितदादांच्या गटात नाराजी

पुणे (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या सतरा जणांसाठी अर्ज दाखल कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरीचे प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न करावी लागणार आहे. पुण्यात तर राष्ट्रवादीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे, पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे सुनील टिंगरे नाराज असल्याचे समोर आले. शेवटी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही अर्ज दाखल केलाय.

पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली, मात्र पुण्यात राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनीही अर्ज दाखल केला आहे आणि हा डमी अर्ज असल्याचं सांगितले जातेय, दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांनी ही बंडखोरी करत पक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत बंडखोरी रोखण्यासाठी कंद यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचा आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. दुसरीकडे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे खुद्द राष्ट्रवादीतच पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. विक्रम काकडे हे संजय काकडे यांचा मुलगा आहे आणि माजी आमदार अनिल भोसले यांचे जावई आहेत.

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या प्रदीप कंद यांनी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. तर दोन अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जाची छाननी आज (मंगळवारी) होणार असून अर्ज माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 

 विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी ११ अर्ज भरले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विक्रम काकडे यांनी अधिकृत अर्ज भरला आहे. तर याच पक्षाचे सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. टिंगरे यांचा अर्ज डमी असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्रीकांत पाटील तसेच तुषार कामठे यांनी अर्ज भरला आहे. यातील कामठे यांचा अर्ज डमी असल्याची माहिती आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी भाजपतर्फे तसेच अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. याशिवाय उमेश म्हेत्रे आणि रणजीत तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अर्जाची छाननी मंगळवारी दि. २ रोजी होणार असून अर्ज माघारी बुधवारपर्यंत दि. ४ रोजी घेता येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.