महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं ; आजपासून आचारसंहिता लागू

महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं ; आजपासून आचारसंहिता लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजले. आज पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. त्यानुसार 15 जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.  आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महापालिका निवडणूकांसाठी १ जुलै रोजी २०२५ रोजीची मतदार यादी प्रभाग निहाय वापरण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, मताधिकार मोबाईल अॅपवर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. 

महापालिका निवडणूकांसाठी २९० निवडणूक अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून ८७० निवडणूक सहाय्यक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. उमेदवारांना ४८ तासा अगोदर प्रचारासाठी मुभा असणार आहे. 

महापालिका निवडणूक खर्च - 

अ वर्ग महापालिका - १५ लाख 

ब वर्ग महापालिका - १३ लाख 

क वर्ग महापालिका - ११ लाख 

ड वर्ग महापालिका - ९ लाख  

निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - 

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५   

छाननी ३१ डिसेंबर २०२६  

माघारीची मुदत - २ जानेवारी २०२६  

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी - ३ जानेवारी २०२६  

मतदान -  १५ जानेवारी २०२६  

मतमोजणी - १६ जानेवारी २०२६