राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूकांची घोषणा आज होणार

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूकांची घोषणा आज होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा आज सोमवार, 15 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, यावेळी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे.

महापालिकांच्या सभागृहांची मुदत संपल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनेक ठिकाणी नगरसेवक नाहीत आणि सध्या महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे.

पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, आता महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. ही पत्रकार परिषद दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.