शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकर यांची निवड

शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकर यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 नुकतीच जाहीर झाली असून ३ जानेवारीपासून निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी होणार आहे. शिवसेनेच्या वतीने ३० ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. डॉ. खा. श्रीकांत शिंदे तसेच मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात काम पाहणारे रत्नेश शिरोळकर यांची कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रत्नेश शिरोळकर यांना दिले.

या निवडणुकीत शिवसेना पक्ष व महायुती मधील इतर घटक पक्ष यांच्याशी समन्वय ठेवणे, नियोजन करणे अशी महत्वपूर्ण जबाबदारी रत्नेश शिरोळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रत्नेश शिरोळकर गेली अनेक वर्ष सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय आहेत त्यांनी यापूर्वी ताराबाई पार्क प्रभागाचे नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत नेतृत्व केले आहे. रत्नेश शिरोळकर यांच्या व्यावसायिक, सामाजिक व राजकीय जनसंपर्काचा फायदा शिवसेना पक्षाने विश्वासाने दिलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी होणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर विजय बालुगडे, शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक नाना कदम, शिवसेना कोल्हापूर उत्तर समन्वयक शारंगधर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.