महा टीईटी परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी 42 केंद्रावर आयोजित - जिल्हाधिकारी अमोल येडगे

महा टीईटी परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी 42 केंद्रावर आयोजित - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET - 2025) रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूरातील 42 केंद्रांवर आयोजित केली असल्याची माहिती परीक्षा आयोजन आणि सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. 

सदर समिती खालीलप्रमाणे - 

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष कार्तिकेयन एस., सदस्य - जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रतिनिधी-पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार, उपायुक्त-2, मनपा किरणकुमार धनवाडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (योजना), गंजी गल्ली अनुराधा म्हेत्रे, प्र. प्राचार्य, डायट डॉ. राजेंद्र भोई, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद डॉ. मीना शेंडकर, जिल्हा नियंत्रण कक्ष सदस्य उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.रविंद्र चौगले, जिल्हा नियंत्रण कक्ष सदस्य विस्तार अधिकारी (शिक्षण) जि.प विश्वास सुतार 

सदस्य सचिव डॉ. मीना शेंडकर यांनी रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथे होणा-या महाटेट - 2025 या परीक्षेबाबतच्या आयोजन व सनियंत्रण समितीसमोर केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

महा टीईटी - 2025 परीक्षा- पेपर 1 सकाळी 10.00 ते 1.00 आणि पेपर 2- दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत होणार आहे. कोल्हापूर शहरांत 42 केंद्रांवर परीक्षा होणार असून शहरांतील 42 माध्यमिक विद्यालय / महाविद्यालय यांची केंद्र निश्चिती करण्यात आलेली आहे. पेपर -1 साठी 7741 आणि पेपर-2 साठी 12311 इतक्या वि‌द्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. परीक्षा सनियंत्रण करण्यासाठी 42 केंद्र संचालक, 10 झोनल अधिकारी, 42 सहाय्यक परिरक्षकांसह, पर्यवेक्षक आणि समवेक्षक यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. परीक्षा पारदर्शी होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर व्हिडीओ शुटींग करणेत येणार आहे. तसेच सीसीटीव्ही, बायोमॅट्रीक, कनेक्ट व्हयू आणि फोटो व्हयु अशा AI प्रणालीच्या माध्यमातून उमेदवारांची तपासणी व पडताळणी होणार आहे. जिल्हा स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर परीक्षाकामी सहभागी सर्व अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत सुचना दिल्या.

तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक आणि अनुग्रह कालावधी देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग उमेदवार आणि माजी सैनिक असलेल्या किंवा शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटूंबिय असणा-या उमेदवारांनी आपल्या प्रमाणपत्राची पडताळणी झाल्याची खात्री करण्याबाबत सुचना देण्यात आलेली आहे.

दोन्ही पेपरपूर्वी उमेदवारांची विविध प्रकारे तपासणी व पडताळणी करणेत येणार असल्याने सर्व उमेदवारांनी परीक्षा कक्षात प्रवेश करण्याच्या वेळेपूर्वी एक ते दिड तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

सी.सी.टीव्ही नियंत्रण कक्ष रजिस्टर व कर्मचारी यांचे नियोजन अचुक करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचविले आहे.