'शाहू' ची ऊस बीले प्रतिटन ३५००रु. प्रमाणे देणार - उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे

'शाहू' ची ऊस बीले प्रतिटन ३५००रु. प्रमाणे देणार - उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे

कागल (प्रतिनिधी) - गळीत हंगाम २०२५ - २६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रतिटन रु.३५००/- प्रमाणे ऊस बिले देणार आहे.यापैकी प्रतिटन ३४००रु.प्रमाणे पहिली उचल देण्यात येणार आहे.तर हंगाम समाप्त झाल्यानंतर दुसरा हप्ता प्रतिटन शंभर रुपये देण्यात येणार असल्याची अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी दिली.

 

याबाबत अधिक माहिती देताना उपाध्यक्ष घोरपडे म्हणाले,कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून कारखान्याची चांगला ऊस दर नियमितपणे देण्याची परंपरा आहे. त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनीही ती कायम ठेवली आहे.याशिवाय शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध ऊस विकास योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. याचाही शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

कारखान्याच्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा,असे आवाहनही घोरपडे यांनी केले.

यावेळी संचालकांसह कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.