युट्यूबरचा आत्महत्येचा प्रयत्न,आंतरजातीय लग्नामुळे आईवडिलांकडून टॉर्चर,पत्नीही गेली सोडून

युट्यूबरचा आत्महत्येचा प्रयत्न,आंतरजातीय लग्नामुळे आईवडिलांकडून टॉर्चर,पत्नीही गेली सोडून

मुंबई (प्रतिनिधी) : 'बिग बॉस १७' फेम आणि लोकप्रिय युट्यूबर असलेला अनुराग डोभाल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अनुरागने त्याच्या युट्यूबवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने घरच्यांवर टॉर्चर केल्याचा आरोप केला आहे. आंतरजातीय लग्नामुळे घरातून सतत टॉर्चर होत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्याने या व्हिडीओत म्हटलं आहे. इतकचं नव्हे तर अनुरागने या व्हिडीओतून त्याच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हा शेवटचा व्हिडीओ असून यानंतर युट्यूब सोडत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

   अनुराग डोभालने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रडून रडून तो बेहाल झाल्याचं दिसत आहे. व्हिडीओत तो म्हणतो, गेल्या काही महिन्यांमध्ये माझं आयुष्य अशा पद्धतीने बदललं आहे ज्याचा मी विचारही केलेला नव्हता. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल,  जेव्हा मी १४ वर्षांचा होता तेव्हा ब्रेन ट्युमर झाला. त्यातून बरा झालो. मोठं झाल्यावर कुटुंबाकडून प्रेशर मी सगळ्यांची स्वप्न पूर्ण केली. मला कधीच वाटलं नव्हतं की माझा शेवटचा व्लॉग असा असेल". 

   माझं आंतरजातीय लग्न झालं आहे. पण यासाठी घरातले तयार नव्हते. पण मी कसं बसं त्यांना तयार केलं होतं. मात्र लग्नाच्या ५ दिवस आधी सगळं बदललं. माहीत नाही काय झालं पण घरातले म्हणाले की आम्ही तुझ्या लग्नाला येणार नाही. आम्हाला हे लग्न मान्य नाही. सगळ्या नातेवाईकांसमोर मला त्यांनी माफी मागायला लावली. माझं लग्न मी एकट्याने मॅनेज केलं. मी हार मानणारा मुलगा नव्हतो. पण, आज माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. मी पागल झालो आहे. माझ्या आईवडिलांनी मला इतकं टॉर्चर केलं आहे की ते म्हणाले आम्ही खूश राहणार नाही आणि तुलाही राहू देणार नाही. त्यांनी माझी बायको रितिकालाही घरात घेतलं नाही. एक दिवस सगळं काही ठीक होईल, या आशेवर मी होतो, असं तो म्हणाला आहे. 

   माझा भाऊ कलम मला म्हणाला की तू जितके दिवस घरात राहशील पण वडील कधीच खूश होणार नाहीत. मी त्याला विचारलं की मी असं काय केलं आहे? तर तो म्हणाला की तू घरच्यांचं नाव खराब केलं आहेस. मला ना आईवडिलांचं प्रेम मिळालं, ना भाऊ आणि नाही बायकोचं...माझ्या मृत्यूला आईवडील, भाऊ कलाम आणि श्रेया हे जबाबदार असतील, असं अनुरागने म्हटलं आहे. आईला घेतलेल्या साडीनेच गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचही त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. त्याच्या व्हिडीओमुळे चाहते चिंतेत आहेत. अनुरागने रितिकासोबत लग्न केलं होतं. त्यांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. मात्र आता त्याची पत्नीही त्याला सोडून गेली आहे.