राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक बूथ कमिट्या सक्षम करून पक्ष मजबूत करा- अध्यक्ष नाझीर काझी

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक बूथ कमिट्या सक्षम करून पक्ष मजबूत करा- अध्यक्ष नाझीर काझी

कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत अल्पसंख्यांक विभागाच्या बूथ कमिट्या सक्षम करून पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझीर काझी यांनी केले.  जिल्हा पातळीसह विधानसभा मतदारसंघनिहाय, शहरनिहाय, तालुकानिहाय कार्यकारिणी तयार करा. मतदार याद्यांच्या पानापानांची जबाबदारी स्वतंत्ररीत्या विभागून घ्या, असेही ते म्हणाले.

कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ॲड. काझी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर होते. मार्केट यार्डातील कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हा मेळावा झाला.भाषणात ॲड. काझी पुढे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ हे सर्वसामान्य व गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांचे नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आहे. या विचारातूनच पक्ष संघटना भक्कम होईल.      यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, कोल्हापूर शहराध्यक्ष व नगरसेवक आदिल फरास यांचीही मनोगते झाली. 

            यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा परिषदेच्या महीला बाल कल्याण समिती सभापती विद्याताई विलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजू सुर्यवंशी, नगरसेवक नियाजखान पटेल, नगरसेवक आदिल फरास, गोकुळचे संचालक किसनराव चौगुले, केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, बाळासाहेब देशमुख, महादेव पाटील- साळशीकर, भिकाजीराव एक्कल, राजेंद्र पाटील, फिरोजखान पाटील, फत्तेसिंह पाटील, दीपक किल्लेदार,  एकनाथ पाटील, रियाज गौस  जमादार, जहिरा मुजावर, शितल तिवडे, आप्पासाहेब धनवडे, संभाजी पाटील, संतोष मुदाळ, निहाल कलावंत, संभाजी पोवार, अमित गाताडे आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर यांनी केले.  प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी केले.