लिपिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा परिषद सीईओ सकारात्मक ; लवकरच विशेष बैठकीचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि आगाऊ वेतनवाढीच्या संदर्भात आज, ३ जुलै रोजी लिपिक वर्गीय संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित मगदूम यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणीने हे निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विविध मागण्यांवर, प्रामुख्याने आगाऊ वेतनवाढ आणि इतर प्रशासकीय प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
सीइओंचा सकारात्मक प्रतिसाद; विशेष बैठक होणार!
संघटना पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत, माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. लिपिकांच्या या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी लवकरच एका 'विशेष बैठकीचे' आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अजित मगदूम, उपाध्यक्ष सागर चव्हाण, युनिस देसाई, विनायक सुतार, अजित कांबळे, प्रवीण पाटील, सुनिता नागणे, कार्याध्यक्ष अश्विन दारवडकर , संघटन प्रमुख कपिल पाटीलयांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




