साईनाथ मल्टिस्टेटच्या जयसिंगपूर शाखेचे उद्घाटन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : साईनाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जयसिंगपूर शाखेचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव होते.

सोसायटीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये आहे. जयसिंगपूर शहरातील सहाव्या गल्लीत असणाऱ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी आमदार अशोकराव माने, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, भाजपचे सावकार मादनाईक, नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, गुरुदत्त शुगर्सचे कार्यकारी संचालक राहुल घाटगे, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, संस्थेचे संचालक डॉ. सुरेश चौगुले, कृष्णात सुतार, सुरेश जाधव, विजय वारके, एकनाथ घोरपडे, बिजनेस हेड अभिजीत संभाजी, नगरसेविका मीनल नांद्रेकर, नगरसेवक बजरंग खामकर, सचिन निटवे, महेश कलकुटगी, संतोष जाधव,पंकज गुरव, कर सल्लागार सुदर्शन कदम, उद्योजक नितीन जाधव, अशोक कोळेकर, माजी नगरसेवक राहुल बंडगर, शाखा व्यवस्थापक नीलेश मधाळे व अन्य उपस्थित होते.




