सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी करत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.या यशस्वी निकालात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.

गुणानुक्रमात प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रणव पाटील यांनी तब्बल ९७ टक्के गुण मिळवत. त्यानंतर सिद्धार्थ परमाज यांनी ९४ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले आहे.तिसऱ्या क्रमांकावर अधिराज जाधव आणि स्नेहा माकीजा यांनी प्रत्येकी ९३ टक्के गुण मिळवत स्थान पटकावले, तर योगीराज पाटील यांनी ९२ टक्के गुणांसह उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेच्या संस्थापिका गीता पाटील यांचे सक्षम मार्गदर्शन, उपमुख्याध्यापिका तरन्नूम मुल्ला यांचे शैक्षणिक नेतृत्व आणि प्रशासक अधिकारी मृणाल पाटील यांचे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले आहे.या भव्य यशामुळे संपूर्ण परिसरात शाळेचे कौतुक होत असून, विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा हा शंभर टक्के निकाल म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठोस पुरावा मानला जात आहे.




