२५ फेब्रुवारी पासून राजेश चषक २०२६ फुटबॉल स्पर्धेला होणार प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी दिनांक २५/२/२०२६ ते ७/३/२०२६ या कालावधीत संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक २०२६ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचे उदघाट्न दुपारी ३.३० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थिती होईल.

विजेत्या प्रथम क्रमांकाला १ लाख २५००० रुपये व चषक ,द्वितीय क्रमांक ७५००० रुपये व चषक ,तृतीय क्रमांक १५००० रुपये, उत्तेजनार्थ एक संघ १५००० रुपये यासह बेस्ट हाफ, बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेन्स, बेस्ट फॉरवर्ड अशी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर मधील १६ संघ व सातारा , सांगली येथील प्रत्येकी एक एक संघ असे १८ संघामध्ये हि स्पर्धा होणार असल्याचे संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, संस्थेचे सचिव सुशिल भांदिगरे यांनी दिली.




