"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला गती ; 1,94,578 महिलांचा सहभाग
कोल्हापूर (प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवण्यात आले. “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” राष्ट्रीय अभियान कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 1,94,578 महिलांनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला.

जिल्ह्यातील ८१ आरोग्य वर्धिनी केंद्रे, नगरपालिका आरोग्य केंद्रे आणि ४१३ उपकेंद्रांमार्फत 4,299 शिबिरांमध्ये 1,94,578 महिलांनी सामान्य तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी - 103708 तसेच 59113 महिलांनी विशेष तज्ञांमार्फत तपासणी करून घेतली. यापैकी 18442 गरोदर मातांनी प्रसूतीपूर्व तपासणीचा लाभ घेतला. या अभियानात रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग, स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, सिकल सेल, रक्तक्षय यांसारख्या तपासण्यांसह लसीकरण, समुपदेशन, स्थानिक आहार प्रोत्साहन, मासिक पाळी स्वच्छता, टेक-होम राशन, माता व बालसुरक्षा कार्ड, आयुष्मान वंदना कार्ड, रक्तदान, अवयवदान नोंदणी आणि “निक्षय मित्र” स्वयंसेवक नोंदणी असे विविध उपक्रम राबवले गेले. महिलांना मोफत तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन मिळाले.
"स्वस्थ नारी अभियानाला जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"
अभियानातील उपक्रम
सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा
1. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी - 67392
2. स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी - 103708
3. गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी - 18442
4. लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी - 5666
5. क्षयरोग तपासणी - 17103
6. सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी - 42173
7. विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन निरोगी जीवनशैली आणि पोषण - 163296
i. निरोगी जीवनशैली आणि पोषण
8. स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे - 5171
9. गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार - 18452
10. मासिक पाळी स्वच्छता व पोषण सल्ला - 31748
11. टेक-होम राशन (THR) चे वितरण -
12. आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी
13. माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड - 2600
14. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी - 7062
15. आयुष्मान वय वंदना कार्ड - 7062
16. सिकल सेल कार्ड - 0
17. पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणीनागरिकांचा सक्रिय सहभाग
i. नागरीकांचा सर्कीय सहभाग
18. रक्तदान शिबीर - 489
19. निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी - 810
या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते, अभियाना मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सर्व आरोग्य विभागा मधील अधिकारी कर्मचारी तसेच खाजगी संस्थाचे विषेश तज्ञ डॉक्टर व इतर पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यांनी अभियान यशस्वी पार पडले.




