12 दिग्गजांनी IPL 2026 मधील टॉप 4 संघ जाहीर करुन टाकले, मुंबई टॉपवर
मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल 2026 चा थरार सुरू होण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. या लीगच्या 19व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात 28 मार्च रोजी होणार असून, पहिल्या सामन्यात गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे भिडणार आहेत.

हंगाम सुरू होण्याआधीच क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. हरभजन सिंग पासून ते इरफान पठाण पर्यंत अनेक दिग्गजांनी स्टार स्पोर्ट्सवर आयपीएल 2026 साठी आपल्या टॉप-4 संघांची निवड जाहीर केली आहे. इतकंच नाही, तर यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण ठरणार याबाबतही त्यांनी ठाम भाकीत केलं आहे. आता या सर्व दिग्गजांच्या भविष्यवाण्या कितपत खऱ्या ठरतात, आणि मैदानावर कोणता संघ खरंच बाजी मारतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
12 दिग्गजांनी IPL 2026 मधील टॉप 4 संघ केले जाहीर..
फॅफ डु प्लेसिस - मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स किंवा दिल्ली कॅपिटल्स
इरफान पठाण - मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स
हरभजन सिंग - मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स (भज्जी म्हणाले, चौथा संघ चाहत्यांनी ठरवावा)
आकाश चोप्रा - मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स
चेतेश्वर पुजारा - मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स
मोहम्मद कैफ - मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स
हनुमा विहारी - मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स
पियुष चावला - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स
सबा करीम - मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
संजय बांगर - मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स
लक्ष्मिपती बालाजी - मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स,
वरुण ॲरॉन - मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद,




